Tuesday, 9 July 2013

श्री स्वामी स्वरूपानंद मंदिर , पावस

श्री स्वामी स्वरूपानंद मंदिर , पावस
                      रत्नागिरी पासून   २ ० किलोमीटर वर पावस नावाचे गाव आहे. या छोट्याश्या गावी आधुनिक काळातील संत आणि कवी सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म  १ ५ डिसेंबर १ ९ ० ३ साली झाला. रामचंद्र विष्णू गोडबोले असे त्यांचे पूर्ण नाव . शिक्षण काळातच वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना सद्गुरु गणेश नाथ महाराज यांचा अनुग्रह झाला .  त्यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात असहकार आंदोलनात भाग घेतला . त्यात त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात तुरुंगवास सोसावा लागला . येथे त्यांनी अखंड सोsहं  साधना केली . त्यामुळे त्यांच्या देहाचे आणि मनाचे अमुलाग्र परिवर्तन झाले . कारागृहातच त्यांना एस . एम . जोशी , अच्युतराव पटवर्धन ,शंकर राव पटवर्धन यासारखे त्यांना स्वामी म्हणून संबोधू लागले . येथून पुन्हा पावस येथे आल्यावर त्यांनी अभंग ज्ञानेश्वेरी , अमृतानुभव , भावार्थ गीता यासारखी अनेक ग्रंथसंपदा निर्माण केली .
                    " मृत्यू पावलो आम्ही " या शब्दात स्वतःच्या मृत्यूचा अनुभव तारखेनिशी नोंदवला . भगवान विष्णूचे त्यांना साक्षात दर्शन झाले होते. १ ५ ऑगस्ट १ ९ ७ ४ रोजी स्वामीजी समाधिस्त झाले . त्याच जागी आज भव्य मंदिर आहे. मंदिर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. स्वामींचे चैतन्यारुपात अखंड वास्तव्य आहे असे मानले जाते. मंदिरात भक्तनिवास आणि प्रसादाची सोय आहे. 

Tuesday, 25 June 2013

श्री लक्ष्मि केशव मंदिर - कोळीसरे

श्री लक्ष्मि केशव मंदिर - कोळीसरे 


              जयगड हून परत येताना चाफे फाट्याच्या ८ -१ ० किलोमीटर डावीकडे कोळीसरे गावाचा रस्ता दिस्तो. येथेच खाली श्री लक्ष्मि केशव मंदिर आहे . मंदिरातील श्री  लक्ष्मिकेशवाची  मूर्ती अतिप्राचीन आहे. सुमारे पाच फुट उंचीची हि मूर्ती नेपाल मधील गंडकी नदीतल्या काळसर तांबूस रंगाच्या शाळीग्राम शिळेतून घडवलेली असून प्राचीन शिल्प्कालेच एक उत्कृष्ट नमुना आहे
          कोकणातील वरवडे गावातील जोशी काणे आणि विचारे  या घराण्यातीन तीन पुरुषांना दृष्टांत झाला .  त्यानुसार त्यांनी रंकाळा तलावातून एक विष्णुमूर्ती बाहेर काढली . हि मूर्ती रस्त्याने आणि जलमार्गाने केश्व्पुरीस आणून स्थापन करण्याचे ठर्वाल्यानंतर कोल्हापूर - देवरुख - संगमेश्वर मार्गे लाकडी पेटीतून मजुरांच्या डोक्यावरून कोलीसरे गावापर्यंत आणली , दुसर्या दिवशी सकाळी जमिनीवर ठेवलेली पेटी उचलताच येईना इतकी जड झाली. कोलीसरे गावाचे प्रमुख ग्रामस्थ भानुप्रभू तेरेदेसाई यांना दृष्टांत झाला कि देवास इथेच राहावयाचे आहे. त्यानुसार १ ९ ५ ० च्या सुमारास श्री लक्ष्मिकेश्वचि येथेच स्थापना करण्यात आली . 
         मंदिर उभारणीसाठी चौथरयाचे खोदकाम सुरु असताना जमिनीत जिवंत झऱ्याचा शोध लागला . या  पाण्याला तीर्थ असे म्हणतात  . मुख्य मूर्ती अतिशय देखणी असून चतुर्भुज आहे, खालच्या उजव्या हातात कमळ (पद्म ), वरच्या उजव्या हातात शंख , वरच्या डाव्या हातात चक्र , आणि  खालच्या डाव्या हातात गदा अशी आयुधे आहेत, हा पशंचग आयुधक्रम लक्षात घेत हि केशवाची मूर्ती आहे. प्रभावळीवर दशावतार  कोरलेले आहेत, मस्तकी करंडक मुकुट आणि अंगाखान्द्य्वर विविध अलंकार आहेत . उजव्या बाजूस गरुड आणि डावीकडे लक्ष्मिची मूर्ती आहे . दोन्ही बाजूस जय आणि विजय उभे आहेत. मात्र ह्या मूर्तीचे मुळ पाषाण रूप पहावायचे असल्यास सकाळी ८:३० - ९ च्या सुमारास पूजेच्या वेळेस जावे लागते . पुजेपुर्वीच्या स्नानाचे वेळी ८ ० ० वर्षापूर्वीच्या उत्कृष्ट शिल्पकलेचे दर्शन घडते .     
         गाभारयात आणखीन एक सुंदर गणेश मूर्ती आहे .  मंदिरासमोरच ७ माजली दीपमाळ आहे. देवस्थान मधेय , लक्ष्मि केशव रत्नेश्वर या नावाच्या आद्याक्षरावरून ' लकेर ' नावाचे भक्तनिवास आहे.   

Friday, 5 April 2013

थिबा प्यालेस - रत्नागिरी

                  थिबा प्यालेस  हे रत्नागिरी मधील एक मोठे आकर्षण आणि पर्यटन स्थळ आहे . थिबा प्यालेस म्हणजे लाल रंगांची मेंग्लोरी कौलांची सुंदर वस्तू ! वास्तूचे सौंदर्य विस्तीर्ण पातान्गानामुळे अधिकच नजरेत भरते . १ ८ ८ ५ मधेय ब्रम्ह्देशाचा राजा थिबा ह्याने सात वर्ष राज्य केले त्याचा पराभव करून ब्रिटीशानी  थिबा राजाला रत्नागिरीत ह्या ठिकाणी बंदिवान करून ठेवले , जेणेकरून त्याचा त्याच्या प्रजेशी काहीही संबंध राहणार नाही आणि त्या नंतर त्याने पुन्हा उद्धव करून नये .
                १ ७ एप्रिल १ ८ ८ ६ मधेय थिबा राज्याला त्याच्या परिवारासह बोटीने  रत्नागिरीत आणण्यात आले . पुढे २ ७ एकर आणि साडे अकरा गुंठे विस्ताराच्या मोठ्या भूखंडावर एक लाख सदतीस हजार चारशे शहाऐंशी  रुपये खर्च करून तीन माजली राजवाडा उभारला गेला आणि १३ नोव्हेंबर १ ९ १ ० मधेय थिबा राजा आपल्या परिवारासह येथे राहण्यास आल.  ३ ० वर्षांच्या कैदेनंतर १ ५ डिसेंबर १ ९ १ ९ ला थिबा राजाचा मृत्यू झाला .
                  राजवाड्याच्या तळमजल्यावर संगमरवरी फारशी असलेले न्रुत्यग्रुह आहे . उंच गच्चीवरून सागराचे दर्शन होते. छताला सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी पट्ट्या लावलेल्या असून अर्धा वर्तुळाकार खिडक्यांना विविध रंगांच्या इटालियन काचा बसवल्या आहेत .
                  राजवाड्याच्या मागच्या बाजूला थिबा राजाने ब्रम्हदेशाहून आणलेली बुद्धाची मूर्ती स्थपन केलेली आहे. राजवाड्याच्या आत पुरातन वस्तू संग्रहालय आहे . तळमजल्यावर कोकणातील आणि देशातील विविध प्राचीन मूर्ती मांडलेल्या आहेत आणि वरच्या मजल्यावर जुन्या लाकडी खुर्च्या आणि प्राचीन मंदिरांचे फोटो आहेत .

सावरकर कोठडी  - राष्ट्रीय स्मारक 
                रत्नागिरीतले विशेष कारागृह. स्वातंत्र्यदेवतेच्या निस्सीम उपसाकाचे राष्ट्रीय स्मारक . १ ६ - ५ -१ ९ २ १ते ३ - ९ - १ ९ २ ३ या दोन वर्षांच्या काळात सावरकरांना या ठिकाणी कोठडीत बंद करून ठेवले होते . मोठा बंदबोस्त ठेवण्यात आलेला होता . बोटीतून पळून जाण्याच्या पराक्रमामुळे ब्रिटीशांनी  पुरा बंदोबस्त ठेवला होता , भक्कम लाकडी चौकटीत लोखंडी साल्या लावलेल्या मजबूत दाराच्या कोठडीत सावरकरांना ठेवून त्यांच्या गळ्यात मणामणाच्या बेड्याही  अडकवल्या होत्या . हे कोठडी आता सरकारने राष्टीय स्मारक म्हणून घोषित केलेली आहे.
             सावरकरांची तसबीर ह्या कोठडीत आहे आणि ह्याची देखभालही एखाद्या पवित्र वस्तू प्रमाणे केली जाते . बाजूच्या छोट्या खोलीत सावरकरांच्या  गळ्यात अडकवलेल्या लोखंडी साखळ्या आणि त्यांना जोडण्यात आलेले अवजड लोहगोळे पाहायला मिळतात . आत्तापर्यंत केवळ" मणामणाच्या बेड्या " हा शब्द प्रयोग ऐकलेला आह . पण प्रत्यक्ष पाहताना त्याचा शब्दश : अर्थ कळतो .
           या वास्तूची बांधणी १ ८ ३ ४ मधेय  ब्रिटीशांनी  दारू गोळ्याच्या वाखारीसाठी केली पुढे १ ८  ५ ३ पासून त्याचा कारागृह म्हणून वापर करण्यास सुरवात केली . येथे सावरकरांच्या बरोबरीनेच सेनापती बापट ह्यांनाही स्थानबद्ध करण्यात आले होते. ह्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी अधिकाऱ्यांच्या पुर्व परवानगीने आणि त्यांचे नियम पळून सकाळी ८:३ ० ते ५ : ३ ० ह्या वेळेत घेत येते .

Friday, 15 March 2013

रत्नागिरी - पतित पावन  मंदिर , 
                         स्वातंत्र्या लक्ष्मि चौकाजवळ सामाजिक समतेचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावलेले पतित पवन मंदिर . स्वा .सावरकर  १ ९ २ ४ - १ ९ ३ ७ ह्या कालावधीत त्यांच्या कुटुंबासमवेत रत्नागिरी येथे स्थानबद्ध केलेले होते. याच काळात रत्नागिरी मधेय सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवली .  
रत्नागिरीतील दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या सहायाने ३ लाख रुपये खर्च करून सावरकरांनी हे मंदिर उभारले . १ ९ २ ९साली कोनशीला बसवून २ ९ फेब्रुवारी १ ९ ३ १ ला फाल्गुन पंचमीला श्री लक्ष्मिनारायणाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली . सर्व हिंदू बांधवाना थेट गाभार्यापर्यंत जावून  देवाची पूजा  करण्याचा अधिकार प्राप्त करून देणारे हे पतित पावन मंदिर भारतातले पहिले मंदिर आहे आणि म्हणूनच त्या दृष्टीने याचे ऐतिहासिक महत्व अनन्यसाधारण आहे 




स्वा . सावरकर स्मारक , रत्नागिरी 

                 पतित पावन मंदिराशेजारीच स्वा सावरकरांचे स्फूर्तीदायी स्मारक उभारण्यात आलेले आहे . येथे येणाऱ्या पर्यटन आणि विद्यार्थ्यांसाठी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे  रत्नागिरीतील समाजसुधारक , स्वातंत्रसैनिक यांचा जीवनपट , आणि पर्यटनस्थळे यांची माहिती सांगितली जाते , आणि पहिल्या मजल्यावर क्रांतीकारकांची माहिती आणि छायाचित्रे असलेली " गाथा बलिदानाची " हे प्रदर्शनी आहे. . १ ९ ५ ७ च्या स्वतान्त्रासंग्रमापासून स्वातंत्र्याच्या काळा प्रयान्ताचे देशभक्त , क्रांतिकारक , हुतात्मे ., यांचा परिचय हे या दालनाचे वैशिष्ट . 
हे सारे पाहताना बाजूला एका शोकेस मधेय स्वा .सावरकरानी  लंडन हून पाठवलेली दोन पिस्तुले , त्यांचा चष्मा , त्यांची काठी , व्यायामाचे मुद्गल आणि त्यांच्या सतत जवळ असणारा जंबिया . ज्या वस्तुनि इतिहास घडवला , संघर्षाचे साक्षीदार झाल्या त्या प्रतेक्ष्य पाहणे खरोखरच रोमांचित करणारे आहे . 
हे स्मारक सकाळी १ ०  ते १ २ आणि सायंकाळी ४ - ६ या वेळेत माफक शुल्क भरून पाहता येते .  

Thursday, 13 December 2012

रत्नागिरी
                         रत्नागिरी हे नाव निश्चित कसे पडले ह्याच्या माहिती नाही . पण ऐकीव माहिती नुसार "रतनगिरी" नावाचे साधू विजापूर हून येथे आले , त्यांच्या वरून हे नाव पडले असचे असे मानण्यात येते.
रत्नागिरी जिल्ह्याची विभागणी तीन विभागात होते . विभाग पहिला - रत्नागिरी शहर , विभाग दुसरा गणपतीपुळे ते जयगड आणि विभाग तिसरा भाट्ये ते राजापूर .
 विभाग पहिला - रत्नागिरी शहरामध्ये भगवती(रत्नदुर्ग ) किल्ला, काळा  - पांढरा समुद्र , लोकमान्य टिळक जन्मस्थान , पतित पावन मंदिर , सावरकर स्मारक , थिबा प्यालेस ,सावरकर कोठडी .

 भगवती ( रत्नदुर्ग ) किल्ला


                रत्नदुर्ग , रतनगड किंवा भगवती किल्ला या नावानी ओळखला जाणारा हा किल्ला शिलाहार कारकिर्दीत गोव्याचा  राजा विजय मार्क देव याचा मुलगा भोजदेव  (राजा भोज ) याने इ .स .१२०५ मधेय बांधला अशी माहिती  मिळते.  घोड्याच्या नालासारखा आकार असलेला १०२ एकर क्षेत्रफळाचा हा किल्ला सुपारे १३०० मीटर  लांब आणि १००० मीटर  रुंद आहे . एकूण २७ बुरुज असलेल्या ह्या किल्ल्याचे सामान्यपणे तीन भाग पडतात - पेठ किल्ला , परकोट , आणि बालेकिल्ला . लांबवर पसरलेली किल्ल्याची दगडी तटबंदी , उजवीकडे खालच्या बाजूला काळा  समुद्र , मांडवी नदी , भाट्याचा खाडी पूल , सुरूबन, थिबा point, अतर डावीकडे भगवती बंदर , पांढरा  समुद्र , आणि मुख्य म्हणजे तीन भागात पसरलेला संपूर्ण किल्ला आमि अमर्याद विस्ताराचा निळाशार सागर .......... खरे तर वर्णन करू तितके थोडेच !!        

 काळा आणि  पांढरा  समुद्र

                 भगवती किल्ल्यावरच्या  दीपस्तंभाच्या उंचीवरून शहराकडे तोंड करून उभे राहिल्यास एकाचवेळी डाव्या बाजूस पंधरा तर उजवीकडे काळा  समुद्र दिसतो. रेती पांढरी असल्याने पाणी पांढरे आहे तर दुसरीकडे काळी रेती असल्याने पाणी काळी  दिसते . काळा समुद्र असलेला भाग म्हणजे मांडवी बंदर , या बंदरावर मुंबईच्या गेट  वे ऑफ इंडिया च्या धर्तीवर गेट वे ऑफ रत्नागिरी अशी प्रवेश कमान उभारण्यात आलेली आहे.

लोकमान्य टिळक जन्मस्थान

टिळकांचा जन्म रत्नागिरी शहरात २३ जुलै १८५६  रोजी  टिळक आळीत  झाला. टिळकांचे मुल गाव दापोली -दाभोळ रस्त्यावर चिखलगाव ज्या ठिकाणी आता त्यांच्या घराच्या जोत्यावर टिळक मंदिर आहे . जन्मानंतर टिळकांचे रत्नागिरी मधेय १०  वर्ष वास्त्याव्य होते .
                                                                                                                                                                                                      

Sunday, 12 August 2012

गणपतीपुळे


                                मुंबईतून रत्नागिरी कडे जायला निघाल्यावर वाटेत एक निवळी फाटा लागतो तिथून गणपतीपुळे पर्यंत साधारण ३५ किलो मीटर चा वळनावळनांचा रस्ता आहे. पर्यटकांचे अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. इथले गणेश मंदिर , विस्तीर्ण सागर तीर , हिरवाई आणि कोकणी पाहुणचार ह्यामुळे ह्या स्थानाला पर्यटकांची जास्त पसंती मिळते. 
                                 गणपतीपुळ्याच्या गणेश स्थापनेमागची कथा सुमारे ४५० वर्षांपूर्वीची आहे. आज ज्या ठिकाणी देऊळ आहे त्या ठिकाणी पूर्वी केवड्याचे बन होते.   जवळच्या उंडी गावातील एक ब्राह्मण वास्तव करण्याच्या उद्देशाने इथे आले , मोगलाइच्या काळात त्यांच्यावर संकट कोसळले, गणेशभक्त असणाऱ्या ह्या ब्राह्मणाने मनोभावे मंगल मूर्तीची पूजा केली , आणि ' संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करेन ' असा निश्चय करून इथल्या केवड्याचा बनत उपासना सुरु केली . " मी  आगरगुळ्याहून( पावस जवळील गणेशगुळे) पुळ्यास आलो आहे. दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त असे माझे स्वरूप असून माझे निराकार स्वरूप डोंगर आहे , माझी सेवा , पूजा अर्चा कर म्हणजे तुझे संकट दूर होईल " , असा दृष्टांत त्यांना उपसानाकाळात झाला. त्यानुसार केवड्याच्या बनत शोध घेतल्यानंतर त्यांना दृष्टांतानुसार श्री गणेशाची मूर्ती सापडली , त्यावर केंबळी छप्पर उभारून त्या ठिकाणी श्री गणेशाची पूजा अर्चा सुरु झाली. 
                         हा दृष्टांत आणि गणपतीपुळयास  सापडलेल्या श्री गणेश मूर्तीचा संबंध पावस जवळील गणेश गुळे येथील मंदिराशी जोडलेला आहे . ज्यावेळी ब्राह्मणास दृष्टांत होऊन मूर्ती सापडली त्याच सुमारास गणेश गुळे मंदिरातील पाण्याचा नैसर्गिक झरा बंद झाला , त्यामुळे "गुळ्याचा गणपती पुळ्यास" गेला  अशी म्हण म्हटली जाते. समुद्राच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर म्हणजे पुळणीवर गणपती प्रकट झाला म्हणून "गणपतीपुळे " हे नाव पडले .हिंदुस्थानच्या आठ दिशांना द्वारदेवता आहेत . त्यापैकी पुळ्याचा गणपती हे पश्चिमद्वार देवता मानली जाते.
                        श्री गणेश मंदिराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. दरवर्षी २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्तसमयीची किरणे थेट गणेशमूर्तीवर  पडतात .  
                  असे हे गणपतीपुळे पर्यटकांचे  अतिशय लोकप्रिय ठिकाण ! इथे पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे , तरीही येणाऱ्या पर्यटकांनी भक्ती स्थानाचे पावित्र्य आणि इथला निसर्ग सांभाळणे हे त्यांचे कर्तव्य आहे. 
                         

Thursday, 5 July 2012

काताळे  जेट्टी
             धोपावे -दाभोळ येथे असणाऱ्या फेरीबोट  प्रमाणेच तावासाळ च्या पुढे  काताळे येथे फेरी बोट सेवा सुरु करण्यात आली आहे. यामधून वाहने घेऊन पलीकडे सैतवडे गावात जाता येते . तिथून केवळ 15-16 किलोमीटर वर जयगड , गणपतीपुळे  , आणि रत्नागिरी अशा ठिकाणी जाता येते. किंवा बोटीने थेट जयगड बंदरात सुद्धा जाता येते. 

राई  - भातगाव पूल 
रत्नागिरी कडे जाताना  राई  - भातगाव पूल 

           गुहागर तालुक्यातील टोकाचे गाव म्हणजे भातगाव आणि रत्नागिरी तालुक्यातील राई या गावांना जोडणाऱ्या पुलामुळे गुहागर - रत्नागिरी हे अंतर 50किलोमीटर ने कमी झाले आहे. तव्सालच्या पुढे भातगाव मार्गे जाणारा रस्ता फारच रमणीय आहे. कधी दोन्ही बाजूला दात झाडीचे डोंगर तर कधी एका बाजूला खोल दरी जंगलातून जाणारा नागमोडी रस्ता कधी संपतो ते काळातही नाही . 
         काताळे जेट्टी  आणि राई भातगाव पुलामुळे थेट गणपतीपुळे , मालगुंड , जयगड , या स्थळांना भेट देऊन रत्नागिरीस जाणे फारच सोयीचे झाले आहे. या सोयी पर्यटकांसाठी निश्चितच स्वागतहर्या  आहेत.