रत्नागिरी
रत्नागिरी हे नाव निश्चित कसे पडले ह्याच्या माहिती नाही . पण ऐकीव माहिती नुसार "रतनगिरी" नावाचे साधू विजापूर हून येथे आले , त्यांच्या वरून हे नाव पडले असचे असे मानण्यात येते.
रत्नागिरी जिल्ह्याची विभागणी तीन विभागात होते . विभाग पहिला - रत्नागिरी शहर , विभाग दुसरा गणपतीपुळे ते जयगड आणि विभाग तिसरा भाट्ये ते राजापूर .
विभाग पहिला - रत्नागिरी शहरामध्ये भगवती(रत्नदुर्ग ) किल्ला, काळा - पांढरा समुद्र , लोकमान्य टिळक जन्मस्थान , पतित पावन मंदिर , सावरकर स्मारक , थिबा प्यालेस ,सावरकर कोठडी .
भगवती ( रत्नदुर्ग ) किल्ला
रत्नदुर्ग , रतनगड किंवा भगवती किल्ला या नावानी ओळखला जाणारा हा किल्ला शिलाहार कारकिर्दीत गोव्याचा राजा विजय मार्क देव याचा मुलगा भोजदेव (राजा भोज ) याने इ .स .१२०५ मधेय बांधला अशी माहिती मिळते. घोड्याच्या नालासारखा आकार असलेला १०२ एकर क्षेत्रफळाचा हा किल्ला सुपारे १३०० मीटर लांब आणि १००० मीटर रुंद आहे . एकूण २७ बुरुज असलेल्या ह्या किल्ल्याचे सामान्यपणे तीन भाग पडतात - पेठ किल्ला , परकोट , आणि बालेकिल्ला . लांबवर पसरलेली किल्ल्याची दगडी तटबंदी , उजवीकडे खालच्या बाजूला काळा समुद्र , मांडवी नदी , भाट्याचा खाडी पूल , सुरूबन, थिबा point, अतर डावीकडे भगवती बंदर , पांढरा समुद्र , आणि मुख्य म्हणजे तीन भागात पसरलेला संपूर्ण किल्ला आमि अमर्याद विस्ताराचा निळाशार सागर .......... खरे तर वर्णन करू तितके थोडेच !!
काळा आणि पांढरा समुद्र
भगवती किल्ल्यावरच्या दीपस्तंभाच्या उंचीवरून शहराकडे तोंड करून उभे राहिल्यास एकाचवेळी डाव्या बाजूस पंधरा तर उजवीकडे काळा समुद्र दिसतो. रेती पांढरी असल्याने पाणी पांढरे आहे तर दुसरीकडे काळी रेती असल्याने पाणी काळी दिसते . काळा समुद्र असलेला भाग म्हणजे मांडवी बंदर , या बंदरावर मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया च्या धर्तीवर गेट वे ऑफ रत्नागिरी अशी प्रवेश कमान उभारण्यात आलेली आहे.
लोकमान्य टिळक जन्मस्थान
टिळकांचा जन्म रत्नागिरी शहरात २३ जुलै १८५६ रोजी टिळक आळीत झाला. टिळकांचे मुल गाव दापोली -दाभोळ रस्त्यावर चिखलगाव ज्या ठिकाणी आता त्यांच्या घराच्या जोत्यावर टिळक मंदिर आहे . जन्मानंतर टिळकांचे रत्नागिरी मधेय १० वर्ष वास्त्याव्य होते .

No comments:
Post a Comment