रत्नागिरी - पतित पावन मंदिर ,
स्वातंत्र्या लक्ष्मि चौकाजवळ सामाजिक समतेचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावलेले पतित पवन मंदिर . स्वा .सावरकर १ ९ २ ४ - १ ९ ३ ७ ह्या कालावधीत त्यांच्या कुटुंबासमवेत रत्नागिरी येथे स्थानबद्ध केलेले होते. याच काळात रत्नागिरी मधेय सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवली .
रत्नागिरीतील दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या सहायाने ३ लाख रुपये खर्च करून सावरकरांनी हे मंदिर उभारले . १ ९ २ ९साली कोनशीला बसवून २ ९ फेब्रुवारी १ ९ ३ १ ला फाल्गुन पंचमीला श्री लक्ष्मिनारायणाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली . सर्व हिंदू बांधवाना थेट गाभार्यापर्यंत जावून देवाची पूजा करण्याचा अधिकार प्राप्त करून देणारे हे पतित पावन मंदिर भारतातले पहिले मंदिर आहे आणि म्हणूनच त्या दृष्टीने याचे ऐतिहासिक महत्व अनन्यसाधारण आहे
स्वा . सावरकर स्मारक , रत्नागिरी
पतित पावन मंदिराशेजारीच स्वा सावरकरांचे स्फूर्तीदायी स्मारक उभारण्यात आलेले आहे . येथे येणाऱ्या पर्यटन आणि विद्यार्थ्यांसाठी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे रत्नागिरीतील समाजसुधारक , स्वातंत्रसैनिक यांचा जीवनपट , आणि पर्यटनस्थळे यांची माहिती सांगितली जाते , आणि पहिल्या मजल्यावर क्रांतीकारकांची माहिती आणि छायाचित्रे असलेली " गाथा बलिदानाची " हे प्रदर्शनी आहे. . १ ९ ५ ७ च्या स्वतान्त्रासंग्रमापासून स्वातंत्र्याच्या काळा प्रयान्ताचे देशभक्त , क्रांतिकारक , हुतात्मे ., यांचा परिचय हे या दालनाचे वैशिष्ट .
हे सारे पाहताना बाजूला एका शोकेस मधेय स्वा .सावरकरानी लंडन हून पाठवलेली दोन पिस्तुले , त्यांचा चष्मा , त्यांची काठी , व्यायामाचे मुद्गल आणि त्यांच्या सतत जवळ असणारा जंबिया . ज्या वस्तुनि इतिहास घडवला , संघर्षाचे साक्षीदार झाल्या त्या प्रतेक्ष्य पाहणे खरोखरच रोमांचित करणारे आहे .
हे स्मारक सकाळी १ ० ते १ २ आणि सायंकाळी ४ - ६ या वेळेत माफक शुल्क भरून पाहता येते .
No comments:
Post a Comment