Tuesday, 9 July 2013

श्री स्वामी स्वरूपानंद मंदिर , पावस

श्री स्वामी स्वरूपानंद मंदिर , पावस
                      रत्नागिरी पासून   २ ० किलोमीटर वर पावस नावाचे गाव आहे. या छोट्याश्या गावी आधुनिक काळातील संत आणि कवी सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म  १ ५ डिसेंबर १ ९ ० ३ साली झाला. रामचंद्र विष्णू गोडबोले असे त्यांचे पूर्ण नाव . शिक्षण काळातच वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना सद्गुरु गणेश नाथ महाराज यांचा अनुग्रह झाला .  त्यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात असहकार आंदोलनात भाग घेतला . त्यात त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात तुरुंगवास सोसावा लागला . येथे त्यांनी अखंड सोsहं  साधना केली . त्यामुळे त्यांच्या देहाचे आणि मनाचे अमुलाग्र परिवर्तन झाले . कारागृहातच त्यांना एस . एम . जोशी , अच्युतराव पटवर्धन ,शंकर राव पटवर्धन यासारखे त्यांना स्वामी म्हणून संबोधू लागले . येथून पुन्हा पावस येथे आल्यावर त्यांनी अभंग ज्ञानेश्वेरी , अमृतानुभव , भावार्थ गीता यासारखी अनेक ग्रंथसंपदा निर्माण केली .
                    " मृत्यू पावलो आम्ही " या शब्दात स्वतःच्या मृत्यूचा अनुभव तारखेनिशी नोंदवला . भगवान विष्णूचे त्यांना साक्षात दर्शन झाले होते. १ ५ ऑगस्ट १ ९ ७ ४ रोजी स्वामीजी समाधिस्त झाले . त्याच जागी आज भव्य मंदिर आहे. मंदिर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. स्वामींचे चैतन्यारुपात अखंड वास्तव्य आहे असे मानले जाते. मंदिरात भक्तनिवास आणि प्रसादाची सोय आहे. 

No comments:

Post a Comment