श्री लक्ष्मि केशव मंदिर - कोळीसरे
जयगड हून परत येताना चाफे फाट्याच्या ८ -१ ० किलोमीटर डावीकडे कोळीसरे गावाचा रस्ता दिस्तो. येथेच खाली श्री लक्ष्मि केशव मंदिर आहे . मंदिरातील श्री लक्ष्मिकेशवाची मूर्ती अतिप्राचीन आहे. सुमारे पाच फुट उंचीची हि मूर्ती नेपाल मधील गंडकी नदीतल्या काळसर तांबूस रंगाच्या शाळीग्राम शिळेतून घडवलेली असून प्राचीन शिल्प्कालेच एक उत्कृष्ट नमुना आहे
कोकणातील वरवडे गावातील जोशी काणे आणि विचारे या घराण्यातीन तीन पुरुषांना दृष्टांत झाला . त्यानुसार त्यांनी रंकाळा तलावातून एक विष्णुमूर्ती बाहेर काढली . हि मूर्ती रस्त्याने आणि जलमार्गाने केश्व्पुरीस आणून स्थापन करण्याचे ठर्वाल्यानंतर कोल्हापूर - देवरुख - संगमेश्वर मार्गे लाकडी पेटीतून मजुरांच्या डोक्यावरून कोलीसरे गावापर्यंत आणली , दुसर्या दिवशी सकाळी जमिनीवर ठेवलेली पेटी उचलताच येईना इतकी जड झाली. कोलीसरे गावाचे प्रमुख ग्रामस्थ भानुप्रभू तेरेदेसाई यांना दृष्टांत झाला कि देवास इथेच राहावयाचे आहे. त्यानुसार १ ९ ५ ० च्या सुमारास श्री लक्ष्मिकेश्वचि येथेच स्थापना करण्यात आली .

मंदिर उभारणीसाठी चौथरयाचे खोदकाम सुरु असताना जमिनीत जिवंत झऱ्याचा शोध लागला . या पाण्याला तीर्थ असे म्हणतात . मुख्य मूर्ती अतिशय देखणी असून चतुर्भुज आहे, खालच्या उजव्या हातात कमळ (पद्म ), वरच्या उजव्या हातात शंख , वरच्या डाव्या हातात चक्र , आणि खालच्या डाव्या हातात गदा अशी आयुधे आहेत, हा पशंचग आयुधक्रम लक्षात घेत हि केशवाची मूर्ती आहे. प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत, मस्तकी करंडक मुकुट आणि अंगाखान्द्य्वर विविध अलंकार आहेत . उजव्या बाजूस गरुड आणि डावीकडे लक्ष्मिची मूर्ती आहे . दोन्ही बाजूस जय आणि विजय उभे आहेत. मात्र ह्या मूर्तीचे मुळ पाषाण रूप पहावायचे असल्यास सकाळी ८:३० - ९ च्या सुमारास पूजेच्या वेळेस जावे लागते . पुजेपुर्वीच्या स्नानाचे वेळी ८ ० ० वर्षापूर्वीच्या उत्कृष्ट शिल्पकलेचे दर्शन घडते .
गाभारयात आणखीन एक सुंदर गणेश मूर्ती आहे . मंदिरासमोरच ७ माजली दीपमाळ आहे. देवस्थान मधेय , लक्ष्मि केशव रत्नेश्वर या नावाच्या आद्याक्षरावरून ' लकेर ' नावाचे भक्तनिवास आहे.
No comments:
Post a Comment