गोपळ गड - गुहागर
गोपाळगड |
गुहागर गावापासून अंजनवेल गावातून थेंट किल्ल्यापर्यंत गाडी जाते. तसेच हौशी पर्यटक अंजनवेल गावातून किल्ला चढूनही जाता येतें. काहींच्या मते , आंग्रे काळात या किल्ल्याचा किल्लेदार गोपाळराव यांच्या नावा वरून गोपाळगड हे नाव पडले असावे . किल्ल्याच्या भक्कम तटबंदित एकूण बारा बुरुजे आहेत . पूर्वेला आणि पश्चिमेकडे दोन दरवाजे आहेत . दरवाज्याच्या दोन्ही बाजूस पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. जसजसे किल्ल्याच्या आत प्रवेश करू तसे एक एक अवशेष दिसु लागतात. किल्लेदाराच्या वाड्याचे , कोठीचे अवशेष आणि तीन विहिरी आणि अनेक छोटी मोठी जोती नजरेस पडतात . तटबंदिवर गवताचे रान नसेल तर संपूर्ण किल्ल्याभोवती फिरता येते. फिरतांना समुद्र , दाभोळची खाडी , वासिष्टी नदी , एनरोन प्रकल्प , पायथ्याशी अंजनवेल , धोपावे , नवानगर असे मोठे नयनरम्य दृश्य दिसतें .
उरफाटा गणपती
गुहागर येथील कोळी समाजातील लोकांना समुद्रात एक गणेशमूर्ती सापडली होती. सर्वांनी मिळून या गणेशाची प्रतिष्ठापना केली. एकदा समुद्राला भरती येऊन गुहागर बुडण्याची वेळ आली असताना ग्रामस्थांनी या गणपतीची आराधना केली. त्या वेळी पूर्वाभिमुख गणेशाने आपले तोंड पश्चिमेकडे करून समुद्राची दिशा बदलल्याची दंतकथा आहे. त्यामुळे या गणपतीचे नाव ‘उरफाटा गणपती’ असे पडले. या गणपतीची प्रतिष्ठापना सुमारे तीनशे वर्षांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येते. हा गणपती खरे कुळाचा आहे. खरे घराण्यातील सदस्य हे मातीच्या मूर्तीची पूजा भाद्रपद गणेश चतुर्थीला न करता घरातील पितळेची मूर्ती घेऊन किंवा नर्मदेचा गणपती म्हणून लाल दगडाची पूजा करतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. ही मूर्ती पांढरी शुभ्र आहे. या मूर्तीची उंची जवळपास अडीच फूट असून चतुर्भुज संबोधली जाणारी ही गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे
No comments:
Post a Comment