श्री दुर्गा देवी मंदिर
दुर्गा देवी - गुहागर |
देवीचा खांब |
गुहागर ह्या गावाची विभागणी एकूण तीन भागात झालेली आहे. खालचा पाट , वरचापाट , आणि देव पाट . ह्यापैकी वरच्या पाटाट दुर्गा देवीचे मंदिर आहे. गुहागर वेलदूर रस्त्यावर वरच्या पाटात एक रंगीत खांब दिसतो याला देवीचे खांब म्हण्तात . इथूनच दुर्गा देवी मंदिराचा रस्ता आहे . सध्याचे मंदिर हे पेशवेकालीन आहे. अलीकडेच देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला . आता थेट मंदिरापर्यंत वाहने पोहोचू शकतात.
देवीच्या मंदिरासमोरील तळे |
देवीचे मूळ स्थान तेराव्या शतकातील आहे. पुण्याच्या कोण्या एका भक्ताने एक संगमरवरी आणि एक काळ्या पाषाणाची मूर्ती करवून आणल्या. त्यातील एक गुहागर येथे स्थापित केली . मंदिर पुर्वाभिमुख असून प्रथम दुमजली सभामंडप , नंतर दुसरा सभामंडप आणि गाभारा अशी रचना आहे.
दोन फूट चौथऱ्यावर सुमारे पाऊ ण मिटर उंचीची अष्टभूजा महिषासुरमर्दिनी रूपातील पंढरी संगमरवरी मूर्ती आहे. देवीच्या मागे सुंदर कोरीवकामं केलेली पितळी प्रभावळ आहे. सभामंडपात कोरीवकाम केलेले लाकडी खांब आहेत . देवी समोर 300 तें 400 वर्षापूर्वीचा अश्वतथ वृक्ष आहे. त्यास " अश्वतथ नारायण " म्हणतात. याच परिसरात चारही बाजूने पायर्या असलेले मोठे तळे आहे.
नवरात्र आणि धुळवडीच्या दिवशी देवीचा मोठा उत्सव असतो. आता नव्याने मंदिराच्या परिसरात भक्तनिवासाची सोय केलेली आहे.
No comments:
Post a Comment