केळशी
दापोली पासून एक तासाच्या अंतरावर असणारे , भारज्या नदीच्या खाडीलगत वसलेले केळशी गाव. गावाच्या दोन्ही बाजूने पाणी असल्याने गाव बेटासारखे दिसते . निसर्गसमृद्ध आणि आणि अत्यंत सुंदर सागराने गावाचे सौदर्य वाढले आहे.
गावात एक गणपतीचे देऊळ आहे. पेशवेकालीन हे गणपतीचे मंदिर आहे. गाब्पतीचे संगमरवरी मूर्ती आहे. यालाच " पांढरा गणपती " असेही म्हणतात देवळाच्या डावीकडे एक समाधी मंदिर आहे. आणि उजवीकडे काळ्या दगडातील पुष्करणी आहे. भिंतीत दिवे लावण्यासाठी कोनाडे आहेत. येथे माघातील गणेशोस्तव पारंपारिक पद्धतीने साजरा होतो.
देवीचा रथ |
देवळाला असणारे दोन घुमट |
केळशी , मुरुड , आंजर्ले आणि वेळास ह्या चारही गावात दुर्गा देवीची देवळे आहेत . असा म्हंटले जाते कि ह्या चारही बहिणी आहेत. केळशीला महालक्ष्मिचे मंदिर आहे. मंदिर उत्तराभिमुख असून पेशवाई काळातील मंदिर आहे. मंदिराच्या आवारात विहीर आणि तळे आहे. तळ्यात अनेक कमले उमलेली आहेत. या देवळाला दोन घुमट असून एका घुमटाखाली महालक्ष्मिचे स्वयंभू स्थान आहे. आणि दुसऱ्या घुमटाखाली सभागृह आहे. सभागृहात येण्यासाठी तीन बाजूने दरवाजे आहेत. दर वर्षी चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा असा मोठा देवीचा उत्सव असतो. त्याप्रमाणेच नवरात्र उत्सवही साजरा केला जातो. ह्या उत्सवात रथयात्रा , कीर्तन असे कार्यक्रम असतात .
महालक्ष्मिच्या मंदिराच्या एक किलोमीटर च्या अंतरावर इतिहासप्रसिद्ध दर्गा आहे. " हजरत याकुब बाबा सरवरी रहामातुल्ला दर्गा "असे याचे नाव असून साधारण ३८० वर्षांपूर्वीचा हा दर्गा आहे.
असे हे केळशी गाव नाविन्यपूर्ण आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी गावात राहण्याची आणि जेवणाची सोय केली हाते.
No comments:
Post a Comment