आंजर्ले कड्यावरचा गणपती
दापोली पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणारे आंजर्ले गाव . नारळ पोफळी च्या बागांनी समृद्ध. पाशिमेकडे रम्य समुद्र किनारा , आणि उजवीकडे उंच डोंगरावर मंदिराचा कळस खुणावतो . पूर्वी मंदिरात जाण्याकरता होडीतून जावे लागे. परन्तु आता ५-६ वर्षांपूर्वी नवीन रस्ता (पूल ) झाला , जो थेट मंदिराच्या पायथ्यापर्यंत घेऊन जातो. नवीन रस्त्यावरून जाताना अनेक नयनरम्य point दिसतात . कोळ्यांचे वस्ती असणारे पाजपंढरी गाव , चकाकता समुद्र , सुवर्णदुर्ग आणि अनुपमेय सूर्यास्त .होडीतून मंदिरात जाताना ५०-१०० पायर्या डोंगरात चढून जावे लागे. म्हणजेच खाडी पार करून जावे लागे.म्हणूनच आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती हे नाव पडले आहे .
मंदिर परिसरात ६०० वर्षांपूर्वीचा बकुळ वृक्ष आहे. मंदिराचे बांधकाम लाकडी होते. मंदिर पूर्वाभिमुख असून पेशवेकालीन आहे. सभागृहाला तीनही बाजूने जाण्यास दरवाजे आहेत. वरती मोठा घुमट आहे . मंदिराच्या शेजारी शंकराचे मंदिर आहे. गणेश मूर्ती ४ फूट असून बाजूला रिद्धी सिद्धी च्या प्रतिमा कोरलेल्या आहेत , पोटाभोवती नाग असून हातात परशु आणि अंकुश अशी शस्त्रे आहेत . मुख्य म्हणजे मूर्ती उजव्या सोंडेची आहे. माघी गणेश चतुर्थीला गणपतीचा उत्सव केला जातो. मंदिरात येणाऱ्या पर्यटकांसाठी आवारातच भक्तनिवास आणि भोजनाची माफक दरात सोय केली जाते.
aamacha ganapati...
ReplyDeleteKonkan is really beautiful.Unspoilt by crowds yet.But I think this is a happening place and is probably best value for money as far as investment is concerned.I love it.Santosh Oak
ReplyDelete