वेळास
मुंबई दापोली रस्त्यावर दापोली कडे वळण्याऐवजी सरळ मंडणगड वरून गेल्यावर वेळास हे छोटसं गाव लागते. नारळ , सुपारी , आंबा यांच्या झाडीत वेळास हे गाव हरवले आहे. नाना फडणवीसांचे हे गाव .
गावात प्रवेश करतानाच उंच दगडी जोत्यावर नाना फडणवीसानी जीर्णोद्धार केलेली महादेव आणि काल भैरव अशी दोन मंदिरे आहेत. रस्त्यापासून वर चढून जाण्यास मोठ्या दगडी पायऱ्या आहेत. उजवीकडे दोन दीपमाळा आहेत . याशिवाय गावात दुर्गादेवीचे देऊळ आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध षष्टीला देवीचा उत्सव असतो.
गावातील मुख्यारास्त्याने सरळ गेल्यावर नाना फडणविसांच्या वाड्याचे दगडी जोते दिसते. जोत्याच्या मध्यभागी दगडी चौथरा बांधून त्यावर नाना फडणवीसांचा अर्धा पुतळा बसवलेला आहे.
वेळासच्या निसर्ग्यारम्य समुद्र किनाऱ्यावर थंडीच्या शेवटी आणि उन्हळ्यात " ओलिव्ह रिडले टर्टल " महोत्सव साजरा केला जातो. हल्लीच्या काळात ह्या कासवांची जात नष्ट होण्याच्या मार्गात आहेत . म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ ह्या संस्थे अंतर्गत हा कासव महोत्सव केला जातो. देश - परदेशातून अनेक कासव प्रेमी येथे भेट देतात .
ह्या छोट्याश्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावात राहण्यासाठी हॉटेल नाही परंतु खाजगी राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते.
No comments:
Post a Comment