दुर्गा देवी |
अत्यंत निसर्गरम्य असे कोकणातील छोटेसे गाव . दापोली पासून ११ किलोमीटर अंतरावर. नारळ पोफळींच्या बागणी समृद्ध .पश्चिमेकडे असणारी घरांची रचना - घर मागच्या बाजूल नारळ , पोफळी , सुपारी , फणस , केळी ह्यांची वाडी (बाग ) त्यानंतर शेत -सुरुची आणि केवड्याची बाग आणि मग शांत ,निळाशार सुंदर समुद्र. आणि पूर्वेकडील घरांची रचना घर मागच्या बाजूल नारळ , पोफळी , सुपारी , केळी ह्यांची वाडी (बाग ) त्यानंतर शेत आणि मागच्या बाजूला डोंगर. श्री सिद्धपुरुष नावाच्या एका व्यक्तीने हे गाव वसवले अशी आख्यायिका आहे. गावात श्री दुर्गा देवीचे देऊळ आहे. अशी गोष्ट आहे कि , श्री सिद्धपुरुष एकदा शेत नांगरताना शेतात त्यांना देवीची मूर्ती सापडली आणि त्यांनी तिथेच दुर्गा देवीचे देऊळ बांधले. असेही म्हटले जाते , अजूनही गावात रात्री १२ वाजता श्री सिद्धपुरुष पांढरा शुभ्र घोडा आणि पांढरी वस्त्रे परिधान करून गावात एक फेरी मारतात . गावतील काही भाग्यावान्तानी घोड्याच्या टापांचा आवाजही ऐकला आहे. गावात श्री सिद्धपुरुष ह्यांचे देऊळ आहे. दुर्गा देवीच्या देवळाचे वैशिष्ट्य म्हणजे देवळातील प्रत्येक खांबावर वेगळे नक्षीकाम केलेले आहे. देवळात चिमाजी अप्पा पेशवे ह्यांनी पोर्तुगीजन बरोबरच्या युद्धात मिळवलेली मोठी घंटा आहे. देवळाच्या मागच्या बाजूला तळे आहे.
दरवर्षी चैत्रात देवीचा उत्सव, रथ गावात फिरून साजरा केला जातो. तसेच अजूनही गावात दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता चौघडा वाजतो. गावात वरची पाखाडी आणि खालची पाखाडी असे दोन भाग आहेत . पाखाडी म्हणजे एका बाजूला दगडी चीरांचा कट्टा आणि बाजूला खाली असणार्या भागास बिदी असे म्हणतात. अशी रचना असण्याचे कारण म्हणजे पावसात घराजवळ पाणी येऊ नये म्हणून हे पाखाडी . बदलत्या काळानुसार आता वरची पाखाडी जावून तिथे डांबरीकरण झाले आहे. परंतु खालची पाखाडी अजूनही आहे तशीच आहे.
मुरुड हे श्री . श्री. ना. पेंडसे ह्यांचे गाव . ज्यांनी गारंबीचा बापू हे पुस्तक लिहिले. तसेच ज्येष्ठ समाजसुधारक श्री . महर्षी धोंडोकेशव कर्वे ह्यांचे जन्मगाव . आज गावात गावकऱ्यांनी महर्षी स्मारक म्हणून वास्तू
बांधली आहे. त्यात महर्षींनी वापरलेल्या सर्व गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत . हे स्मारक सर्व पर्यटकांसाठी खुले आहे . गावात इयत्ता १० वी पर्यंत शाळा आहे . १० वर्षांपूर्वीचे मुरुड गाव आणि आत्ताचे ह्यात बराच कायापालट झालेला आहे . आज घरोघरी पर्यटकांसाठी राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते.
बांधली आहे. त्यात महर्षींनी वापरलेल्या सर्व गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत . हे स्मारक सर्व पर्यटकांसाठी खुले आहे . गावात इयत्ता १० वी पर्यंत शाळा आहे . १० वर्षांपूर्वीचे मुरुड गाव आणि आत्ताचे ह्यात बराच कायापालट झालेला आहे . आज घरोघरी पर्यटकांसाठी राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते.
मुंबई पासून मुरुड 7 तासाच्या अंतरावर आहे. आणि पुण्यापासून ५ तासावर आहे . त्यामुळे साहजिकच इथे येणारे पर्यटक जास्त करून पुण्यातून येणारे आहेत . तसेच पुणेकरांना समुद्राचे जास्त आकर्षण आहे. नोकरी धंद्यानिम्मिताने जे गावातील लोक बाहेर आहेत ते दरवर्षी न चुकता गणपती, दिवाळी , शिमगा (होळी ) अशा सणांना आवर्जून घरी जातात .
असे निसर्गाचे वरदान लाभलेल्या मुरुडला जरूर भेट द्यायलाच हवी. मुरुड गाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे .